नवीन लेखन...
Avatar
About गौरी सचिन पावगी
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

सामंजस्य

क्लास च्या आवारात राहणाऱ्या watchman च्या घरातून आवाज येत होता. त्याची बायको गरम गरम पोळ्या लाटत मुलांना जेवू घालत होती. महिला दिनाचं औचित्य आणि हे दृश्य , मगाशी जे अपुरं वाटलं ते इथे पूर्ण झालं..या सगळ्या सुद्धा कर्तबगार महिला नाहीत का? फक्त आता महिलांच्या या बाजूला कर्तबगारी म्हणून बघणं आपण सोडून दिलंय. […]

दवबिंदू

दवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी. […]

कहो ना.. ‘आज भी’..प्यार है

१४ जानेवारी, साल 2000  या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला ‘कहो ना प्यार है’ सिनेमामुळे एक ‘अजिंक्यतारा’ मिळाला…हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास! […]

‘The wall’ on the wall… आणि मी

एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही…चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड. […]

समतोल…

वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा.. […]

वेग..

वेग वाढवण्याचा काळ आयुष्यात नक्की येतो आणि त्यावेळी तो वाढवताही आला पाहिजे. मात्र कुठे वेग कमी करायचा , आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर वेग स्थिर ठेवायचा आणि आखेर, कुठे थांबायचं…वाहन चालवताना हे सगळे निकष लावून मन स्थिर ठेवून जसं आपण ड्राईव्ह करतो तसंच आयुष्य का ड्राईव्ह करू नये? ‘नजर हटी दुर्घटना घटी’ चं तत्व आयुष्य जगतानाही का अवलंबवू नये..? […]

केळफुल…

शब्दच किती अनोखा ..केळ फूल …लागतं फळ झाडाला, पण दिसतं फुलासारखं..जस जसं वाढत जातं, तसे त्याचे एक एक पदर उलगडायला सुरुवात होते आणि त्यातून अगदी तान्ह्या आकाराची केळी बाहेर दिसू लागतात.. हळू हळू केळफुलाचे पदर गळून खाली पडायल लागतात. आणि केळी आकार घेऊ लागतात. […]

अशोक…

नाही.. सम्राट अशोकांबद्दल हा लेख नाही.. सम्राट अशोकां सारखा हा अशोक पराक्रमी राजा वगैरे नाही तरी, हा जितका मला विलक्षण वाटतो तितकाच, पुढे वाचल्यानंतर तुम्हालाही विलक्षण वाटेल या बद्दल खात्री आहे.. […]

ती ‘खूप काही’ करते..

तिच्या नकळत ‘ती’ काय काय करते याची जाणीव तिलाही नसते..तेव्हा, अशी आपली एखादी ‘गृहिणी’ मैत्रीण, बहीण, शेजारीण आपल्याला भेटली तर ‘ती’ काही करत नाही असं म्हणून तिला दुखावण्यापेक्षा ‘ती’ खूप काही करते हे तिला सांगुया..’ती’ एक शक्ती तत्व आहे याची तिला जाणीव करून देऊया. […]

ज्योत

श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक…. याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते.. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..