खंत…
दिसत नाही मला माझं गांव जगाच्या नकाशात मला लाज वाटते त्याची मी खंतावतो… मी फिरतो जगभर धुंडाळतो नवनवी शहरं करतो वाहवाई तिथल्या सुधारणांची करतो घाई माझं गांव ‘तसं’ बनवण्याची आणि बघतो स्वप्नं निवृत्तीनंतरच्या वास्तव्याची येतो गांवात सारखे-सारखे करु लागतो बदल ‘तिथल्यासारखे’ बदलतं गांवाचं रूप काय सांगू त्याचं अप्रुप? पोस्ट करतो त्याच्या प्रकाशफिती सांगतो त्याची माहिती शहरातून […]