नवीन लेखन...

निसर्गाची शाळा

मह्या शेतातं जोंधळं, डोले डौलं वार्‍यावरं पानं हिरवे वल्लेचिंब, सळसळती तालातं…!!! वारं गाई गाणं छानं, घुमे शिळं कपार्‍यांत, कणीस डोकाऊनं पाहते, धुंडते शिळकर्‍यालं..!!! पानावर पानं सात, पानं बसले चोपून जसं नववारी लुगडं, नेसलं नटुनं थटुनं.!!! दानं भरती कनसातं, मोती पवळंयाची आरासं लपत येई चिमना चोरं, नेई दानं पळवुनं…!!! फुलपाखराच्या संगतीनं, फुलं पहाती लपुन, मध्ये लुडबुडे सुगरनं, […]

बापू….

बापू, आजही तु दिलेल्या टोपीच्या, झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले, नासके विचार वाहू लागतात ना तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते….!!! बापु, तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे, पण जव्हाबी तेह्यनं तुलं, मारायचा प्रयत्न केला नं, तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा पुनर्जिवीत झालास…!!! वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं, मारायचा खुप प्रयत्न केला, टोप्यांना वेगवेगळे […]

गेला आस्तालं सुरयं……

ना.धो.महानोर सर भावपूर्ण श्रद्धांजली गेला अस्तालं सुरयं,काळवंडलं आभाळं जिवं झाला कासावीसं,झाला काळुख आंधारं उजेडाची हि लेखनं,कशी रूकली रूसली आज सरोसती माय,हुंदका फोडून रडली झाली पोरकी कविता, रानी आंधार आंधारं कुठं शोधु तुलं आत्ता,कुठं गेलासी सोडूनं युगां पडलं भगदाडं,झाला युगांत युगांत वलावल्या पापण्यां त्या,वघळत वघळती अवकाश मोठा झाला,त्यालं तुहीच गरजं ये रे आता परतुनी,उजवं सरू मायची कुसं […]

बाई मी शेतातं निंदते….

बाई मी शेतात, शेतातं निंदते, काळ्या मातीतं, जिवनं सांधीते… हाती खुरपं, खुरप्यानं खुरपीते, काळ्या मायंवर,नक्षी मी काढीते….! बाई मी पिकाशी,पिकाशी बोलीते… मव्हा संसार, संसार सांगते… मन हालकं, फुलकं करीते… सुख द:खाचा हिशोब मांडीते…! बाई खुरपं गं, खुरपं संवंगडी… त्याच्या साथीनं, किटाळ काढीते… तणं शावकार, देनं मी मोडीते… काळ्या मायचं रून मी फेडीते….! बाई जगाचा जगाचा जलम…. […]

शेवटची ओळं

देह चिखलाचा गोळा, माय बाप रे कुंभार त्यासी देती ते आकार, तसा तसा घडे जाय..!!! लहानपणी माय बाप, बहीन भाऊ गोतावळा, मोठा व्हता बायको भार्या, जिनं व्यापुनं टाकीते…!!! लेकर बाळ आन संसारं, दमछाकीचा तो खेळं, किती धावशीलं पळशीलं, भावना बाजाराचा मेळं…!!! देवा बाजार मांडला, सगळे बाव्हले बाव्हले, मोह टाकुनिया त्यातं, जिवं कामालं लावले…!!! देवा देले दोनं […]

माहेरचा पाऊसं

मह्या शेतातलं पिकं, कस डौलतया तोर्‍यातं, शेतं हिरव हिरवं, मन हारके सुखानं. नभ ढगाळ ढगाळ, झोंबी झोंबाडं गारवा, मना सुखवी शिळानं, पिक नाचे शहारून. ढगं बरसती थेंब थेंब, मोती पखरले शेतातं, त्याचा लेऊन शिंगार, पिकं डौलते डौलात. हिरवले रानं वनं, गेली सृष्टि गोंजारूनं, पशु पक्षी चहकती, कोकिळं करीते गुंजनं. पशु,पक्षी,झाडं,वेली, अवघी धरा उल्हासली, आला महेरचा पाऊस, […]

तणकटं

लय फोफावलय तणकटं…. धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं….. रान कमी पडलं मनुन काय की, आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं… आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं, निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं… काल घरातुन निंघताना भिंतीवर एक पिंपळाचं झाड पाह्यलं… मनात विचार आला, मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय, मनुनं ईथबी एक उगवलय काय की? लय फोफावलयं…. गल्लीतंबी अन दिल्लीतंबी, घरातंबी […]

डी.पी.

तिसर्‍या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती . […]

सलामी

कोण भोंगळा,कोण वंगळा, कुणी कुणाला हिन लेखे, माळेमध्ये एकशे आठ मनी, एकशे नववा कुठं बसे….!!! गोड कडुनिंब,रेशमी बाभळी, आम्रवृक्षाला कोण पुसे, अनैतीक मितही नैतीक बनती, डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे….!!! विचारधारा, विवेक विवेक, राततुनं तं,बापय नं दिसे, विवेक,विचार,विकास,प्रकाश सत्तेपुढे ते उणे असे..!!! आधी धर्म मग जाती पाती, पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती, विवेक लपतोय निबीडं अंधारी लबाडं ढोंगी […]

ग्यानबाची मेख

ग्यानबाची मेख….!!! कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं, कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं, कपडे काढायची अन फाडायची जणु, चषकी स्पर्धाचं लागली आहे…..!!! शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत, शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म, कॅमेर्‍यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय, हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय…!!! आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं… कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय, पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय, न्यायी धर्मराजा […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..