एक सामान्य करदात्याच पत्र
मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात. […]