पाऊस आलाय…..भिजून घ्या
पाऊस आलाय…..भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या ऑफ़ीस रोजच गाठत असतं काम नेहमीच साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं मनाची हौस पुरवून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या सर्दी पडसे रोजचेच….. त्याला औषध तेच […]