गजरा…
“हे घे गजरा,माळ तुझ्या केसात.”..मी माझ्या ‘so called Modern’समजणार्या मैत्रीणीला ‘offer’ केले.. “ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!…इति माझी मैत्रीण.. तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले.. “काय झालं?वाईट वाटलं का तुला?”..माझ्या मैत्रीणीचे हे वाक्य ऐकून मला तिची किवच आली..मनात म्हणलं,वाईट कसलं वाटतयं,हसू येतयं..गजरा,old fashioned?म्हणे…आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या,चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत.. […]