Articles by Guest Author
पुरणपोळी आणि भैरवी
पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त […]
बापाचं मन
घरामधला कर्ता बाप, जेंव्हा येतो बाहेरून | पाळलेली मांजर सूद्धा, आनंदाने जाते शहारून | मॅव मॅव करत बिचारी, फिरते सा-या घराला | पण ते प्रेम कळत नाही, पोटच्या त्या पोराला | मालकाला बघून कूत्रा, झेपाऊन घेतो ओढ | साखळी दाटे मानेला, कमी होत नाही वेड | शेपटाचा गोंडा घोळून, घूटमळते ते दाराला | पण ती ओढ […]
आता तरी देवा मला पावशील का
आता तरी देवा मला पावशील का ? सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ? पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का ? सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ? चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरिबाला मार मिळतो लाच घेती त्यांना आळा घालशील का ? सूख ज्याला म्हनत्यात ते […]
मनाचा उपवास
शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे. खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो. शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास […]
१६०० कोटींच्या कंपनीचा मालक
कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा. अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं. मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट […]
भारवाहन क्षमता
भारताने नुकतेच १०४ सॅटेलाईट एकाच लॉंचरमधून अवकाशात सोडले. जगभरातून त्याचे कौतुक झाले.. एकाच वेळी १०४ !!! जबरदस्त !!! पण जगाला काय माहित की आमच्याकडे कोणत्याही वस्तू वाहून नेण्याची क्षमता म्हणजेच भारवाहन क्षमता (Carrying Capacity) वर्षानुवर्षे फार मोठी आहे….
रडत राऊत बखर
“शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य […]
भारताचा जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर
भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच “०७ मार्च १९८७”रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या. अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत […]
जन्म परतफेडीसाठी
वपु काळे यांच्या एका पुस्तकातील हा उतारा. वाचा आणि विचार करा.. “आपण हा जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तींसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात, असं नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणा-या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची एक परतफेड […]