नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

लग्नातल्या अक्षता तांदूळाच्याच का?

आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.  याची खालील दोन महत्वाची कारणे- तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला  धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते ! दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर […]

चार धाम

काही वर्षापूर्वी, ब्रह्मविद्या साधना मंडळाच्याबरोबर सिद्धटेकचा गणपति व भीमा शंकर ही ठिकाणे बघण्यासाठी एक ट्रीप आयोजित केली होती. या ट्रीपबरोबरच आमचे ‘केदारनाथ’ सोडून इतर सर्व ज्योतिर्लिंग पाहून झाली होती, विनासायास झाली होती. तेव्हा पासून माझ्या मनात राहिलेले ज्योतिर्लिंग, केदारनाथ पाहण्याची खूप उत्सुकता होती. काही कारणांसाठी शशीचा यास ठाम नकार होता. केवळ आपापसात वाद नकोत म्हणून मी तिथे जाण्याचा तेव्हा हट्ट केला नाही. […]

आइसक्रीम खा…पण हे वाचा

बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय […]

काव्यसुमनांजली – म्हणजेच अपेक्षा वाढविणार्‍या कविता

एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला […]

तरीही माझं जीवन सुखाच होतं

व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्‍याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल. माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून […]

गोरेपणाच्या मलमांच्या पानभर जाहिराती

प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा…. प्रति, संपादक, दैनिक लोकसत्ता. महाशय, आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची […]

राजसाहेब कुठे आहेत?

अनिल नाचणे, मुंबई राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय… राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा… हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!! […]

हा तर सोशिकपणाचा कळस

हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं… एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील ….. Anil Nachane – anc@gmail.com

आपल्यासारख्या सामान्यांची लायकी काय?

आनंद लिमये  या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे. आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं…. जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची. हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी आनंद लिमये

शेतकर्‍यांना ‘येलो जर्नालिझम’ची डागणी

सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर ‘येलो जर्नालिझम’च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा […]

1 49 50 51 52 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..