MENU
नवीन लेखन...
Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना विशेषत: अनेक दिवाळी अंकांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

माझ्या ‘वानखेडे’च्या खास आठवणी

या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत होत आहे. […]

तेथे “कर” माझे जुळती

येथे आपण अश्या काही प्रथितयश भारतीय क्रिकेटपटूंना “कर” आदरपूर्वक जोडणार आहोत, ज्यांच्या आडनावाच्या अखेरीस ‘कर’ हा प्रत्यय आहे. हे ते ‘कर’धारी मराठी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे किंवा अपवादात्मक स्थितित इतर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात काही जण तर केवळ प्रतिनिधित्व करून थांबले नाहीत तर क्रिकेट मैदानावरील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने महाराष्ट्राची, मराठी जनांची आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. […]

दत्ता हिंदळेकर : स्मृतिआडचा मराठमोळा क्रिकेटवीर

( मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दत्ता हिंदळेकर यांच्या निधनाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली , त्यानिमित्ताने स्मरणांजली ) क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा खेळ. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी हा खेळ भारतात रुजवल्यानंतर इथल्या स्थानिकांनी त्याला चांगलेच आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मोठ्या महानगरांतून या खेळाचा जास्त प्रसार झाला. त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यांमधूनही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. या खेळासाठी फार साधनसामुग्री […]

मुंबई : रणजीचे राजे

भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली. […]

अजिंक्य रहाणे : क्रिकेटमधील सद्गृहस्थ

….. असा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो. […]

Dream11- “परदेशी भारतीय” कसोटीवीरांची

आम्ही क्रिकेटशौकीन मित्रमंडळी पूर्वी एक आवडीचा खेळ अधूनमधून खेळत असू, तो म्हणजे आपल्या पसंतीचा एक सर्वोत्तम संघ निवडणे. उदाहरणार्थ – सगळ्यात उत्तम जागतिक संघ किंवा सर्वकालिन उत्तम भारतीय संघ किंवा एखाद्या दशकातील सर्वोत्कृष्ट संघ वा फक्त डावखुऱ्या खेळाडूंचा श्रेष्ठ संघ वगैरे वगैरे. सध्या डिजिटल च्या जमान्यात युवक मंडळी मोबाइल वर “ Dreams11”, “MPL”, “My11Circle” अश्या मोबाईल […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..