विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता, अध्याय २ :: श्लोक २३ आणि २४.
सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? आत्मा या संकल्पनेवर अध्यात्माचा डोलारा उभा आहे. सजीवाचे शरीर जीर्ण झाले म्हणजे त्यातील आत्मा निघून तो दुसर्या नव्या शरीरात प्रवेश करतो. जुने शरीर मरते तर नवे शरीर जिवंत होते.
[…]