नवीन लेखन...
ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे समर्थक जास्त धोकादायक

आपले सैन्य देशाच्या सीमांचे संरक्षण डोळ्यात तेल घालून करीत आहेत. हे करीत असताना पाकिस्तानच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद होत आहेत, तर काहींना दहशतवाद्यांशी लढतालढता वीरमरण येत आहे.आताही मध्यप्रदेशच्या भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून `सिमी’ या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसटल्याची घटना घडली. मात्र, कारागृहातून पळालेल्या या आठ दहशतवाद्यांना आठ तासांतच […]

पॅराकमांडोजचे शौर्य – भारताचे भूषण

काश्मिरमधे या वर्षात १३७ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ७१ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.१९८८- २०१६ या कालावधीमध्ये ३०,७७२ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ९८३९ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले. पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवरील शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महाराष्ट्रातील सांगलीतील जवान नितीन सुभाष कोळी शनिवार सकाळी हुतात्मा झाले.कर्तव्य बजावत असलेले जवान आपले रक्षण करत असल्यामुळे आपण […]

‘ब्रिक्स’ ची फलश्रृती

मुख्यतः परस्पर आर्थिक सहकार्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’च्या व्यासपीठाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला अन्य घटक राष्ट्रांचे सक्रिय सहकार्य मिळवण्यासाठी तर केलाच, पण या परिषदेअंती जारी केलेल्या ‘गोवा घोषणापत्रा’ मध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करीत असल्याचे या नेत्यांच्या तोंडून वदवून घेत ‘‘दहशतवादा विरोधात उभे राहू, एका स्वरात बोलू आणि त्याविरुद्ध कार्यरत राहू’’ असे […]

पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ सुरूच ठेवायला हवे

‘सर्जिकल स्ट्राईक’चे गांभीर्य कळायला उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. 18 सैनिकांचा जीव घेणारा हल्ला झाल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली.तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागली. त्यामुळे लष्कराचे मनोधैर्य ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी हल्ल्याचा निषेध केवळ शब्दांनी करून भागत नाही, तर दहशतवाद्यांना अद्दल घडेल अशा प्रकारे कृतीतून उत्तर द्यावे लागते. तेच लष्कराने […]

चीनला जरब बसण्याकरता अमेरिका भारत सहकार्य ही काळाची गरज

मागच्या वर्षी अलिप्ततावादी देशांची परिषद व्हेनझुएलानं पुढं ढकलली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी. ते त्यावेळी ताजिकिस्तान, कझाकिस्तान आदी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. आता यंदाही या परिषदेला पंतप्रधान जाणार नाहीत. यातून संदेश स्पष्ट आहे. आता अलिप्ततावादाचं नेतृत्व करण्यापेक्षा अमेरिकेशी सामरिक व्यवहारवाद अधिक मोलाचा वाटतो. अमेरिका आणि भारताच्या शिष्टमंडळामध्ये एकाच वेळी दिल्ली आणि वॉशिंग्टनमध्ये दोन वेगवेगळ्या विषयांवर वाटाघाटी होऊन […]

वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात मैत्रीचा पूल

लक्ष्य फाउंडेशन’तर्फे अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा पूल बांधण्याचे काम तेथे कर माझे जुळती… १९९९ मध्ये भारताला पाकिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबर युद्धाला सामोरे जावे लागले. हिमालयाच्या १८००० फूट उंचीच्या शिखरावर- भारत- पाक सीमेवर- कारगिल येथे, हाडं गोठविणार्या थंडीत आमच्या जवानांनी शर्थीने युद्ध केले आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले प्राण […]

स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती लिक होणे धोकादायक

बांधणी प्रक्रियेत पाणबुडय़ांमध्ये बदल करणे जरुरी भारतीय नौदलाची सामरिक क्षमता वाढवणा-या अत्याधुनिक स्कॉर्पिन पाणबुडीच्या क्षमतेचा गोपनीय माहितीचा २२ हजार पानांचा दस्तऐवज फुटल्याने देश हादरून गेला आहे.फ्रेंच कंपनी डीसीएनएसच्या सहाय्याने मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या पाणुबडय़ांची उभारणी सुरू असून त्याचा तपशील ‘द ऑस्ट्रेलियन’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची गंभीर दखल घेत भारतीय नौदलाला या […]

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग

राज्यसभेत काश्मीरमधील चर्चेला उत्तर देताना, त्यानंतर लगेच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचीस्थान, गिलगिट आणि बाल्टिस्तान या प्रांतांमध्ये पाकिस्तानने करत असलेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर ज्यामध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तान सामील आहे, हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही तो नक्कीच यापुढे मिळवणारच. याशिवाय त्यांनी बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याचाही उल्लेख […]

1 13 14 15 16 17 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..