नवीन लेखन...
ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पाऊले

मागच्या आठवड्यात संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे, आता संरक्षण मंत्री पद गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आले.अरूण जेटली गेले सहा महिने संरक्षण मंत्री आणि अर्थ मंत्री हा कार्यभार सांभाळत होते. संरक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय ही दोन्ही खाती एकाच व्यक्तीकडे असणे योग्य नव्हते. […]

हवाई दलाची युद्धसज्जता एक महाचिंतेचा विषय: लढाऊ विमानांच्या ताफ्यात सातत्याने घट

लाहोरमध्ये ०२/११/२०१४ ला झालेल्या स्फोटात ६१ जण ठार, तर १०० जण जखमी झाले. वाघा सीमेपासून फक्त ५०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पॅँगाँग लेक परिसरात चीनने अलीकडेच घुसखोरी ०२/११/२०१४ ला समोर आली. याच भागात खुष्कीच्या मार्गानेही पाच किलोमीटर अंतरापर्यंत आपले सैन्य घुसविले.भारताच्या तीव्र आक्षेपास न जुमानता चीनच्या आणखी एका पाणबुडीसाठी कोलंबो येथील बंदराची जागा देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे.
[…]

मतपेटीच्या राजकारणामुळे पश्‍चिम बंगालमधे वाढता दहशतवाद

इतक्या मोठ्या प्रमाणावर आतंकी कारवाया ज्या ठिकाणी चालत असतील, तेथे स्थानिक प्रशासन, पोलीस यांना याविषयी माहिती कशी मिळत नाही? कि माहिती मिळूनही पोलीस-प्रशासन त्याकडे कानाडोळा करते कि पोलीसही त्यात सामील असतात? तृणमूलच्या नेत्याच्या घरी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनीच पुरावे नष्ट केले आहेत. बंगलादेशची राजधानी ढाका येथे मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवून आणण्याची हुजी अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती आहे व काही राजकीय नेत्यांना, नामवंत व्यक्तींनाही ठार मारण्याची हुजीची योजना होती, असे इतके दिवस झोपलेले पश्चिम बंगालचे पोलिस आता सांगत आहेत.
[…]

भारत-पाक संबंध एक शुन्याचा पाढा

काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेद्वारे सोडवावा, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) पाकिस्तानला झटका दिला. भारताचे दोन्ही प्रमुख शेजारी पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारताच्या सीमा भागात गोळीबार व घुसखोरी करत असतात.
[…]

बांग्लादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज

चार-पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव येथे पाच हत्यारबंद बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडले. अर्थातच या अतिरेक्यांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव होता. गेल्या तीन-चार महिन्यात अनेक बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडण्यात आले होते.
[…]

अतिरेक्यांच्या धमक्या व ‘ब्रेकिंग इंडिया’ चे भाकीत

अल् कायदा भारतात दहशतवादी कारवायांच्या मदतीने इस्लामिक राज्य उभे करण्याच्या तयारीत आहे, याची कल्पना ‘ब्रेकिंग इंडिया’ या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा यांनी शेकडो पुराव्यानिशी ४ वर्षांपूर्वीच दिली होती. देशात जेहादी दहशतवादी, माओवादी यांनी परस्परांना मदत करून आपल्याला योग्य अशी भूमी वाटून घेतली आहे, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले होते.
[…]

जम्मू-काश्मीर वर राष्ट्रीय आपत्ती:अभुतपुर्व लष्करी मदतकार्यांमुळे परिस्थिती काबुमध्ये

जम्मू-काश्मीर हे राज्य भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. देशी विदेशी पर्यटक, दांपत्यांना मधुचंद्रासाठी आवडणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. हिंदी चित्रपटांसाठी लागणारे निसर्गाचे देखावे, वैष्णोदेवीची यात्रा, अमरनाथ यात्रेचे चित्रिकरण करण्यासाठी दिग्दर्शक काश्मीरचा आवर्जून वापर करत असतात. मात्र गेली काही वर्षे हे राज्य दहशतवाद्यांची कर्मभूमी बनून आहे. […]

सीमेवरील गोळीबार, घुसखोरी आणि देशाची युध्दसिद्धता

भारत पाकिस्तान सीमारेषेवर पाक सैन्याकडून जोरदार गोळीबार केला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय लष्करास ‘पूर्ण पाठिंबा‘ देण्यात आला असून यामुळे पाकिस्तानच्या भूभागामध्ये लष्कराने नेमके जोरदार हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. लष्कराने कोणत्याही ‘निर्बंधांशिवाय‘ पाक सैन्यास उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे पाकमधील ठार झालेल्या जवानांची वा दहशतवाद्यांची संख्या अनपेक्षितरित्या वाढली आहे.
[…]

संरक्षण, परराष्ट्र धोरणांवर पाकिस्तानी लष्कराची घट्ट पकड

सध्याच्या परिस्थितीत बोलणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानसह जगालाही भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखविली. जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत भारताने अशीच ठोस भूमिका घेतली होती. भारतापासून फारकत घेण्याची उघड इच्छा व्यक्त करणार्‍या हुरियतच्या नेत्यांशी बोलणी करणे हा पाकचा खोडसाळपणा होता. […]

नरेंद्र मोदींचा हिट नेपाळ दौरा; भारत नेपाळ संबधात एक नवीन सुरवात

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच पार पडलेला नेपाळ दौरा भारताच्या संरक्षण आणि आर्थिक हितसंबधांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भारताची नेपाळविषयीची असंवेदनशीलता आणि नेपाळचा भारताविषयीचा वाढता संशय यामुळे उभय देशांमधील संबंधात गेल्या काही वर्षांपासून प्रगती दिसत नव्हती.
[…]

1 19 20 21 22 23 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..