नवीन लेखन...
ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

२०१३ मध्ये महाराष्ट्रात नक्षलवाद आणि आदिवासी विकास

इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने सुरतमध्ये अणुबाँब स्फोट घडवण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक कबुली इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळने दिली आहे.२६-३० डिसेंबर २०१३ मध्ये ४०,००० पोलिस आणी सिआरपिएफ़ जवानांनी नक्षलग्रस्त भागात ओपरेशन चालवले. त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही.

[…]

नेपाळमध्ये माओवाद्यांचा पराभव भारतासाठी महत्वाची घटना

नेपाळी काँग्रेस या पक्षाने सर्वाधिक १०२ जागा जिंकल्या. त्याला सत्तास्थापनेसाठी पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्याखालोखाल कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) या पक्षाने ९२ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वात मोठी पीछेहाट झाली आहे ती युनिफाइड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओइस्ट (यूसीपीएन-एम) या पक्षाची. फक्त २५ जागांवर विजय मिळाल्याने बंडखोर माओवादी नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष आता तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. 
[…]

३७० कलम आणि काश्मिर खोर्‍यातील भावनिक एकात्मता

काश्मीरवर हक्क दाखवण्याची आंतरिक उर्मी पाकिस्तानला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच पाकिस्तान, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताबरोबर वारंवार युद्धाची भाषा बोलत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी राजकारण्यांची “बेबाक बकबक’ नुकतीच गाजली आणि आपण असे बोललोच नव्हतो असा खुलासा करण्याची पाळी नवाज शरीफांवर आली.
[…]

आय.एन.एस विक्रांत, विराट, ‘विक्रमादित्य’ आणि नौदलाची युद्ध सज्जता

नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावाही घेतला जातो. यंदाच्या नौदल दिनावर मात्र १३ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘आय.एन.एस. सिंधुरक्षक’ या पाणबुडीला झालेल्या अपघाताचे सावट आहे. या अपघातात नौदलाला ही पाणबुडी आणि त्यावरील १८ नौसैनिक गमवावे लागले होते. सध्या भारताच्या नौदलात ‘सिंधु’ वर्गातील (रशियन किलो वर्ग) एकूण दहा पाणबुड्या कार्यरत आहेत. 
[…]

सागरी सुरक्षेबद्दल निष्काळजी राहणे आपल्याला परवडेल का? भाग १

ऐतिहासिक काळापासूनच महाराष्ट्राची किनारपट्टी विशेष सुरक्षित नाही. शस्त्रे, दारूगोळ्याची तस्करी व अतिरेक्यांची घुसखोरी किनारपट्टीवरून सुरू असते आणि हे प्रकार रोखावयाचे कोणी? नौदल, तटरक्षक दल, पोलिस आणि गुप्तचर संघटना एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मग्न असतात. 

[…]

निवडणुक काळात सुरक्षा नेत्याची आणि सामान्य नागरिकांची

आता  निवडणुकांचा काळ आहे. सध्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे. सात महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे हा निवडणुकांचा काळ चालू झाला आहे, भाजपने आता नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विषय उपस्थित केला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी बिहारमध्ये पाटण्यात मोदी यांचा हुंकार मेळावा होता. या मेळाव्यात मोदी भाषण देणार होते.
[…]

छोटी राष्ट्रे पण चीन विरोधी: भारताचे मात्र चीनशी नरमाईचे धोरण

दमदाटी करून चीनने आपल्याला बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही  करावयास लावली.चीनने भारतीयाना व्हिसा नाकारायचा आणि भारताने मात्र चिनी नागरिकांसाठी पायघड्या घालायच्या हे  भारतासाठी लज्जास्पद आहे. चिनी बनावटीची शस्त्रे मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतातील बंडखोरांना दिली जात आहेत.
[…]

चीन दौर्‍याने काय साधले?

चीनमधून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आम्ही कोणताही त्रास देणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच व्हिसा मिळेल. आम्ही यापूर्वीच असे वचन दिले होते आणि ते आम्ही तंतोतंत पाळू.
[…]

आव्हान चिनी ड्रॅगनचे

आव्हान चिनी ड्रॅगनचे हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे पुस्तक 1962 चे चिनी आक्रमण, भारत चीन संबंधाचे आजचे स्वरूप,- भविष्यात चीनसोबत युद्ध होईल का ? असे अनेक पैलू सांगणारे सुबोध पुस्तक आहे.
[…]

केरनमधील लढाईचा संदेश

जम्मू-काश्मीरच्या जम्मू भागातील केरन या गावात गेल्या आठवडाभरापासून घुसखोरी करून ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना शेवटी हुसकावून लावण्यात आले आहे. भारतीय लष्कराने विलक्षण संयमाने पार पाडलेली ही लष्करी मोहीम आता संपली आहे. लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी ही घोषणा केली. […]

1 22 23 24 25 26 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..