नवाझ शरीफ यांच्या विजयानंतर भारत-पाक संबंधांत नवे पर्व हा भाबडा आशावाद
फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पाकिस्तानी मतदारांनी नवाझ शरीफ यांना निवडून दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाक संबंधांचे नवे पर्व सुरू होईल असा भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाही. पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या. एका लोकनियुक्त सरकारकडून दुसर्या लोकनियुक्त सरकारकडे मतपेटीद्वारे झालेले हे देशातील पहिले सत्तांतर आहे.
[…]