माओवादी कारवायांचे क्षेत्र विस्तारण्याचा निर्णय गंभीर व चिंतेचा
माओवाद्यांच्या नुकत्याच झालेल्या मध्यवर्ती बैठकीत आपल्या कारवायांचे क्षेत्र विस्तारण्याचा व त्यात शहरी विभागांचा समावेश करण्याचा झालेला निर्णय गंभीर व चिंतेचा आहे. अबूज महाड या गडचिरोली व बस्तरच्या सीमेवर असलेल्या पहाडावर नुकत्याच झालेल्या या बैठकीत आदिवासींसोबतच दलित, अल्पसंख्य व महिलांच्या वर्गांना आपल्या चळवळीत ओढून आणण्याची योजना आखली गेली.
[…]