भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका
कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे . काही पद्धतीत चांद्रमहिने विचारात घेतात . या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात . काही प्रांतात सौर महिने विचारात घेतात . आपले सणवार , धार्मिक उत्सव विशिष्ट तिथीला असतात , म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात . […]