इलेक्ट्रिकल इंजिनिअरची दुग्धव्यवसायात क्रांती!
नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने बेसखेडा जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्री रवी पाटील या होतकरु तरुणाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘चॅलेंज’ म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.
[…]