ट्रेड युनियन्स् आणि संप
जागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.
[…]