दिवाळी आणि फटाके….!
भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही. […]