अनुत्तरीत राहिलेला प्रश्न, स्त्री अबला का सबला?
आज जगातील बहुतेक राष्ट्रात समाजिक स्थरावर व कायद्याने स्त्रीला बऱ्याच बाबतीती पुर्षांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. परंतू देशातील व जगातील स्त्रियांवरील अत्याचार होताना प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियातून वाचले आणि बघितले की वाटते, कुठल्याही गोष्टी कायदे केल्याने किंवा त्याची कठोर अंमलबजावणी केल्याने उद्देश साध्य होतातच असे नाही. त्यासाठी स्त्रीच्या प्रती पुरुषातील पुरुषी अहंकार जावा लागतो, मानसिकता सकारात्मक असावी लागते. “स्त्रीही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे” हे कालातीत सत्य लक्षात ठेऊन ते कृतीत आणले तरच आज स्त्रियांवर सर्वत्र होणारे अत्याचार थांबतील आणि समाजात ती सन्मानाने व ताठ मानेने जगायला शिकेल. स्त्रीने जर का चंडिकेचे रौद्र रुप धारण केले तर ती कुठलेही संकट सहज परतवू शकते. अशी कित्येक उदाहरण आपण पाहतो पण…….
[…]