लक्षवेधी सूचना…
कुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात. […]