नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे. […]

नेमेची येतो मग पावसाळा !

आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली तरी मुंबईतील पावसळ्यात आपले ‘येरे माझ्या मागल्या’ अशी दरवर्षी स्थिती असते. सर्व संबंधितांना हुलकावण्या देत मुंबई आणि परिसरात अचानक एवढा पाऊस पडतो की सगळ्यांची तारांबळ..उडवून देतो! अर्थात याला अनेक करणे आहेत त्यातील काही आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला जरा भूतकाळात डोकावाव लागेल. ब्रिटीशांना त्यांचा पक्का माल देशात सर्वत्र रल्वे, […]

पाऊस पहिला वळवाचा !

चाहूल पहिल्या वळवाची, मनात रिमझिम पावसाची, घोंग-घोंग वारे व्हायले, आकाशाने रंग बदलले !   पाऊस पहिला वळवाचा, मनात साठवून ठेवायचा, घन:शाम ढगांना घेऊन आला, आठवणींना उजाळा दिला !   पाऊस पहिला वळवाचा, अचानक धो-धो बरसायचा, डोंगर दर्यांना खुणवायचा, लता वेलींना हसवायचा !   पाऊस पहिला वळवाचा, बच्चे कंपनीच्या आवडीचा, कारण शाळेला दांडी मारायचे, पावसात मनसोक्त भिजल्याचे […]

“डे” आणि “दिनां”वर बोलू काही !

परत परत विसरून लक्षात ठेवण्यासाठीच बरीच वर्ष आपण नुसते ‘डे’ आणि ‘दिन’ साजरे करत आलो ! खरोखरच त्यात ओलावा होता का? प्रत्यक्ष कृतीतून का नाही दिसत? आणि लक्षात ठेवले जात त्यांचे महत्व? का होतो ‘दिन’ दीनवाणा? आणि ‘डे’ ‘नाईटा’ (काळोखा) सारखा ! सध्या ‘डे’ आणि ‘दीनां’चे नुसते इव्हेंट होताहेत ! इव्हेंट पुरते लक्षात राहते, पुन्हा उपड्या […]

एकत्र कुटुंबाचे फायदे

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे श्री जितेंद्र रांगणकर यांनी लिहिलेले ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ या सदरात दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या कुटुंबाची ओळख करून घेताना होते. श्री जितेंद्र रांगणकर यांचे सर्वच विषयावरील लेख खूप वाचनीय, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे असतात. […]

क्षण

‘क्षण’ दिसायला दोन अक्षरे चुकीच्या निर्णयाने क्षणात जीवन मातीमोल करे ! चांगल्या बेरजा क्षणाच्या वजाबाक्या वाईटाच्या, कधी गुणाकार कधी भागाकार ! क्षणाच्या विलंबाने चुकते प्लेन, चुकते ट्रेन, निसटते संधी, आयुष्यात येते आंधी ! मनाच्या चलबिचलतेने क्षणार्धात सुटतो तोल, होत्याचे नव्हते करण्या उद्युक्त करतो क्षण ! त्याच क्षणाला सावरायला हवे क्षणाक्षणाला मन भानावर हवे, जगण्याच्या चांगल्या उमेदीने […]

संघर्ष !

निसर्गाचा मानवाशी संघर्ष, प्राणीमात्रांचा मनुष्याशी संघर्ष ! जीवन जगणे म्हणजेच संघर्ष, जगण्यातील अर्थ म्हणजेच संघर्ष ! संघर्षाची काही ठोस व्याख्या नाही, कलियुगात माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नाही, संघार्षावाचून माणसाला जगणे शक्य नाही ! संघर्ष जगण्याची आशा दाखवतो, जीवनातील संघर्षात माणूस शहाणा होतो ! संघर्षात जीवन तावून सुलाखून निघते, आणि सोन्यासारखे स्वच्छ होते ! संघर्ष म्हणजे स्पर्धा, स्पर्धा […]

वाईट व्यसनांच्या विळख्यात !

इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली. दिनांक १८ जुन २०१५ रोजी मालाड, मालावणी येथे विषारी दारू पिऊन १३ जणांना प्राण गमवावे लागले ही बातमी वाचनात आली. असा दुर्दैवी अंत एखाद्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलणाऱ्या प्रमुखाचा झाल्यास त्या कुटुंबावर काय बिकट प्रसंग […]

मुलगा की मुलगी होण्यास जबाबदार कोण?

आज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असतांना भारतातील काही नागरिकांच्या मनातून जुने, बुरसटलेले विचार आणि अंधश्रद्धा काहीकेल्या जाता जात नाहीत. काहींना असे वाटते मुलगी म्हणजे डोक्याला विनाकारण ताप. तिची […]

1 6 7 8 9 10 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..