नवीन लेखन...
Avatar
About Jaywant Bhaurao Wankhade
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

ती आल्यावर

ती आल्यावर बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर मुलगा गेला हातामधुनी माय सांगते चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर किती जाळले सूर्याने मज ती नसताना नभात जमले मेघ दिवाणे […]

सोडून साथ सारे साथी निघून गेले – गझल

वृत्त :- आनंदकंद सोडून साथ सारे साथी निघून गेले ठेवून एकट्याला, पक्षी उडून गेले घेऊन शीर हाती सैनिक तुटून पडले ही बातमी मिळाली, शत्रू पळून गेले दुष्काळ कोरडा हा डोळ्यात पूर आले जित्राब पोसलेले भूके मरून गेले. रडणार कोण येथे मरणास रोजच्या या डोळ्यातले तळेही आता सुकून गेले दुनियेस जिंकणारे तोऱ्यात फार आले जिंकायचे सदा पण […]

गझल

गझल वृत्त :- आनंदकंद समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा आलीच ना कधी ती भेटायला मला पण स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा या बावऱ्या मनाला […]

मानवता – अभंग

माणसाने द्यावे | प्रेम माणसाला | हीच वाटे मला | मानवता ||१|| माणसाने आता | करावा आदर | करावी कदर | माणसाची ||२ || ठेवू गड्या आता | कर्मावर श्रध्दा | गाडू अंधश्रद्धा | पाताळात ||३|| जिवंत असता | करू रक्तदान | शरिराचे दान | मेल्यावर ||४|| प्रत्येकाचे मन | आपण जपावे | प्रत्येकाने द्यावे | […]

लाच घेणे पाप आहे.. सांगणारे पाहिले मी

गझल वृत्त :- व्योमगंगा लाच घेणे पाप आहे सांगणारे पाहिले मी वाट सत्याची धरूनी चालणारे पाहिले मी झोपडी माझी सुखाची खाण व्हावी वाटते मज ; गर्व मोठ्या बंगल्याचा मानणारे पाहिले मी फाटका माझा खिसा पण दान देणे जाणतो मी पावत्या छापून खोट्या मागणारे पाहिले मी लोकशाही श्रेष्ठ आहे हेच लोका सांगती ते लोकनेते साफ खोटे बोलणारे […]

मागू तिला कसे मी ?

मागू तिला कसे मी ? वृत्त :- आनंदकंद लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा गेली निघून कोठे ,गाठू तिला कसे मी? घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी? राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी ? घालून पोत काळी,भेटावयास आली हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी ? चर्चा नको म्हणाली,गावात भेटल्याची सोडून गाव जा […]

गझल – नको वागणे आज झाडाप्रमाणे

*गझल* *वृत्त :- भुजंगप्रयात* *लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा नको वागणे आज झाडाप्रमाणे तया लोटते जग कवाडाप्रमाणे धनाचेच लोभी ,महाराज काही किती वागती ते ,लबाडाप्रमाणे सगेसोयरे फार लाडावले तू तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे कशाला कुणाशी ,अबोला धरावा नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे तुला कर्ण कोणी, […]

गझल – प्रार्थना ही तिला भावली शेवटी

गझल वृत्त :- स्त्रग्विनी *लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा प्रार्थना ही तिला,भावली शेवटी साथ देण्यास ती,धावली शेवटी पोसली मी जिला रक्त पाजून ती; नागिणी सारखी,चावली शेवटी शोधली मी दया गावखेड्यात पण माझिया अंतरी , घावली शेवटी कोण येणार अंती बरे सोबती साथ येणार ती,सावली शेवटी सोडली साथ मी,काल तीची जरी हाक देताक्षणी पावली शेवटी © […]

अंगठी बोटातली फेकून गेला

*गझल* *वृत्त :- व्योमगंगा* *लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी; स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला ” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..