बालभारतीचा इतिहास पुस्तक आणि फिल्मच्या रूपात
राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. […]