नवीन लेखन...

मराठी भाषेचा अभिमान बाळगायलाच हवा !

कधीकाळी प्रथम क्रमांकावर असलेली आपली मायभाषा मराठी आपल्याच काही मूर्ख लोकांमुळे किंवा त्यांच्या मुर्खपणामुळे मागे पडली. ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्यप्रकार आहेत, ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेत १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत आणि ज्या भाषेला संतांचे बोल आहेत अशा आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान हा बाळगायलाच हवा . […]

अर्थहीन निवडणुका !

निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही.  […]

संवाद……. कधीही महत्वाचा !

सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. […]

अजून किती सहन करायचं ?

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत.  आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही   त्याचीच परिसीमा ठरली. […]

मराठी टिकवा नव्हे! मराठी टिकवूया !!

“इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे  इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल. […]

कलेचं “राज”कारण !!

….. पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस नेमकं उलट पाहतो आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसेंसाठी काहीच जागा ठेवण्यात आली नाही. बातमीतली जागा तर सोडाच ….नुकताच, ठाकरे सिनेमाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्या शोमध्ये त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं. […]

पैसा…. फक्त एक जगण्याचं साधन !

‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो !!! […]

भोग

मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की, भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग || ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म || देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प […]

चारित्र्य

उद्या जर घराघरातल्या स्त्रिया ‘मी टू – मी टू’ असं म्हणायला लागल्या तर त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होईल ? समाजात त्या विषयासंबंधी कोणती प्रतिमा तयार होईल, याची थोडीशी तरी कल्पना करायला हवी. स्त्री-पुरूष संबंधातील चिरंतन सत्य काय आहे, हे जाणून घेतलं- समजून घेतलं तर मनातली वावटळ शांत होईल. […]

दुर्गुण

आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..