नवीन लेखन...
Avatar
About क्षितिज दाते , ठाणे
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

समाधान

मी सहज आईस्क्रीम पार्लर मधल्या आमच्या सकट इतर काही टेबलांवर नजर फिरवली . कुठे मित्रांच्या गप्पा , कुठे लहान मुलांचे गोंगाट , काही परिवार , वयस्कर व्यक्ती , कुणी सेल्फी काढतायत कुणी आईस्क्रीम चे फोटो काढतायत आणि बरंच काही … […]

कोडं

काळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय… […]

गच्ची

गच्चीवर जाणं प्रत्येकाच्याच आवडीचं असलं तरी त्याचं अप्रूप मात्र तळ-मजल्यापासून जसं वर-वर उंच जावं तसं कमी होत जातं .. तळातल्या लोकांचं गच्चीत कधीतरीच जाणं होतं म्हणून त्यांना जास्त ओढा असतो आणि वरच्या मजल्यावरच्यांसाठी तर गच्ची म्हणजे अगदी “उठण्या-बसण्यातली “. […]

पहिलं प्रेम

हातात हात घेऊन युगुल रंकाळ्यावर … गुलाबी हवा … गुलाबी थंडी … गुलाबी विचार … दोघांच्या मनाचं पार “जयपूर” झालेलं .. जुन्या आठवणी ,किस्से , गमती-जमती … गप्पा सुरु. […]

४ फेब्रुवारी…फेसबुक.. हॅप्पी बर्थडे

“चेहरा किताब” या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक… आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा…. सॉलीड जुळतंय ना ??….. अहो….गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या “चेहरा” रुपी “किताब” वर आपापल्या “नजरसे” कोणी कोणी “क्या क्या लिखा है” ते अविरत “पढतोय” ना. … मग झालं तर?? […]

चौकट

प्रत्येक जण आपापल्या सामाजिक ,कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक, धार्मिक अशा अनेक मर्यादेनुसार आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर या काळ रेषेच्या कुठल्या ना कुठल्या बिंदूवर असतो आणि त्या बिंदूच्या थोडं मागे आणि थोडं पुढे , आपल्याला जुळवून घेता येईल एव्हढ्या क्षेत्रात चहूबाजूंनी प्रत्येकानी आखलेली असते स्वतःभोवती एक ………..”चौकट.” […]

कळलेच नाही

“तक्रार करता करता प्रेम कधी झाले .. कळलेच नाही … बेसूर वाटता वाटता , सूर कधी जुळले .. कळलेच नाही …” […]

जोकर

कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो … आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं. […]

“स्पेस, पॉझ आणि आपण “

दोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम. […]

“सूर “जुने”.. ध्यास नवा”

“ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”.. […]

1 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..