नवीन लेखन...

उपरती

नाही केली कधीच वारी नाही देखिली कधीही पंढरी नाही घडले स्नान भिवरेच्या थडी बांधत राहिलो मजले आणि माडी हाती नाही घेतले टाळ ना आले मुखी अभंग संसारात करीत राहिले नाना रंग आणि ढंग ना दान ना धर्म ना दाखविली माणुसकी आता कोण दाखविल कशाला मला आपुलकी या महामारीने उपरती झाली म्हणून आलो मी शरण नाही सोडणार […]

सूप

धान्याला सूप… धान्य निवडणे. फटके मारून फोलपट दूर करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छता महत्वाची असते. हे काम तिलाच करायचे आहे. चांगली गोष्ट निवडावी पारखावी खडे रुपी दुर्गुण अलवार पणे दूर करावेत. मनातील वाईट विचार फटकारुन सगळ्यांची मनं स्वच्छ करायला लागतात… […]

साठवणीतील एक आठवण

आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती. […]

घडलय बिघडलंय

कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे. […]

मी आहे छोटासा वारकरी

मी आहे एक छोटासाच वारकरी रांगत रांगत जाणार आहे पंढरपुरी आधी जाईन मी भिवरेच्या रम्य तिरी त्या पाण्यात असते मौज किती भारी बाकीचे सारे असतील अभंगात नाचण्यात दंग तोवर पोहचेंन मी रमत गमत मंदिरात घट्ट मिठी मारेन मी माऊलींच्या पायाला रखुमाई धावतील मला उचलून घ्यायला पहिला वारकरी म्हणून मला मिळेल मोठा मान असुनही सर्वातला वारकरी मी […]

धुणे

एक नूर आदमी दस नूर कपडा. किंवा कपड्यासाठी नाटक करीशी तीन प्रवेशाचे असो. वस्र ही मूलभूत गरज आहे हे मात्र खरं आहे. आणि कपडे धुणे हे एक घरातील बायकांचेच काम आहे असा अलिखित नियम आहे. पूर्वी घरात माणसं खूप आणि वेगवेगळ्या वयोगटातील. त्यामुळे कपड्यांचे वर्गीकरण असे होते. एक अंगावर एक दोरीवर एवढेच कपडे असायचे तरीही जशी भांडी ढिगभर तसेच धुणे मोटभर….‌ […]

धुणी भांडी

हल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. …. […]

अनोखा अनुभव

कुणाचा विश्वास असो वा नसो. माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास आहे. माणूस गेला की सगळे संबंध संपतात असे म्हटले जाते. पण त्यांचा जीव कुणात तरी गुंतलेला असतो. माझी काकू शेवटच्या काळात बरीच वर्षे माझ्या कडे रहात होती. मूलबाळ नव्हते म्हणून आम्हालाच तिने आईच्या मायेने वाढवले होते. खूप कष्ट घेतले होते आमच्या साठी. शेवटी तिचे सोवळे ओवळे शहरात […]

काठीला आवाज नसतो

परकिय देतात खूप मोठा मान स्वकिय करतात एकसारखा अपमान परकिय करतात हो खूपच आदर. स्वकियांना नाही मुळीच कसलीही कदर बाहेरचे लावतात किती प्रेमाने माया. घरच्या साठी मात्र जन्म घालवला वाया अनेकंनी जोडली अनेक नाती. नेमकी स्वकियांनी याचीच केली माती पण देवाच्या दारी नसतो कधीच अंधार. कुणाच्या तरी रुपाने देतो तो शाब्दिक आधार आधार देवाच्या काठीला नसतो […]

कोण असेल?

पूर्वीचा जन्म आताचे वागणे याचा काही संबंध असतो की नाही यावर चर्चा नको. पण जेंव्हा कधी असे प्रसंग डोळ्यासमोर घडतात तेंव्हा विचार करणे भाग पडते. मागे एकदा मी एका राममंदिरात एक माकड येऊन असेच कार्यक्रमात बसून राहिले होते असे वाचले व फोटोत पाहिले होते. तर महादेवाच्या मंदिरात नागराज आले होते. याचीही माहिती वाचली होती. […]

1 5 6 7 8 9 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..