हळवा कोपरा
मातृदिनाच्या दिवशी अनेकांनी लिहिलेल्या आठवणी वाचून मी खूपच अस्वस्थ झाले होते. आई होती पण तिची माया प्रेम मिळाले नाही. बाकीच्या गोष्टी नाहीच. असो मला लिहायला जमले नाही म्हणून आईचे उपकार कधीच विसरणार नाही. उलट मीच तिला समजून घेतले नाही. याचेच खूप खूप वाईट वाटते. तिला व्यक्त होता आले नाही म्हणून तिची माया प्रेम कमी होती असे नाही. परिस्थितीने ती हतबल होती. पण तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी आयुष्यात खूप काही करु शकले. […]