मोहीनी शरद् पोर्णिमेची
मोहीनी शरद् पोर्णिमेची की पापण्यांच्या अर्धोन्मिलीत चंद्राची अतृप्ततेचा भास हा की चांदण छायांची बाधा ही विखार यौवनाचा असा शोषतो अभिशाप जाणिवांचा बेभानतेचा अंगार हा मंत्रचळातला विखार जसा.. खरंच रेंगाळतोस का रे मनांत..? अस्पष्टसा.. अंधुकसा… कुठेतरी धुक्यातल्या इंद्रधनुसारखा मखमली मलमली तारुण्याचा पिसारा उलगडत… स्वप्न झुल्यांची तोरणं पापण्यावर झुलवत सोसांचा इतका आवाका अवखळ होणं ,बेभान होणं कधी थांबवशील..? […]