नवीन लेखन...

पुण्याचे अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय

पुण्यातील  नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच […]

१५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू… ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, […]

विट्यातील विजयादशमी पालखी शर्यतीची परंपरा

सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे. दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात […]

फ्रीडम वॉल

मुलांना जाणवणारा हा भाषिक अडसर दूर करुन त्यांना त्यांच्याच भाषेत व्यक्त होण्याची संधी आसगावच्या जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली. शाळेतीलच एक भिंत काळ्या रंगाने रंगवण्यात आली. या भिंतीवर मुलांनी त्यांच्या मनातलं बिनधास्त लिहावं असे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे भिंतीवर लिहिताना नाव न लिहिण्याची सूट देण्यात आली. या भिंतीचं फ्रिडम वॉल असं नामकरण करण्यात आलं.
[…]

पानशेत धरणाच्या परिसरातील “निळकंठेश्वर”

समुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ पाहून अत्यंत सोपा असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी प्रत्यक्ष ही चढण छ्यातीमध्ये दम भरवणारी अशीच आहे. पायथ्यापासून तासाभरात माथ्यावर पोहचता येते. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची झुळुक यामुळे क्षणार्धात थकवा नाहीसा होतो. […]

किल्ले निवती

काही दुर्गावशेष आणि निसर्गसंपन्न परिसराचा वारसा मिरवणारा निवतीचा किल्ला दिर्घकाळ स्मरणात रहाणारा असाच आहे….
[…]

किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होय.
[…]

किल्ले भरतगड

किल्ल्यांचे माहेरघर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतगड किल्ला म्हणजे निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याचे एक सुंदर ठिकाण..
[…]

किल्ले माणिकगड

चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..