दिवाळी अंक
लाडू-करंज्या-शंकरपाळी-उटणं-मोती साबण आणि दिवाळी अंक एवढ्या भांडवलावर मराठी मध्यमवर्गीयांची दिवाळी हमखास आनंदातच जायची.दिवाळी अंक वाचणारे लोक ‘सांस्कृतिक’ समजले जायचे. बऱ्याच अंशी ते खरंही होतं. दिवाळी अंक काढणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना किमान ‘समज होती. आता कुणीही उठून चार जाहिराती, हौशी बोरुबहाद्दरांचा मजकूर जमवतो आणि संपादक अमुक तमुक, असं बिरुद मिरवत दिवाळी अंक काढतो. […]