नवीन लेखन...
Avatar
About मकरंद करंदीकर
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

वालावलचा लक्ष्मीनारायण !

कुडाळ जवळील वालावल हे देखील निसर्गाने गर्द हिरव्या झाडीने झाकलेले असेच एक छान गाव ! येथील लक्ष्मीनारायणाचे देऊळ म्हणजे डोंगर, माड , तलाव , कलात्मक दीपमाळा अशा सर्व संपत्तीने सजलेले प्रशस्त देवस्थान आहे ! बहामनी सत्तेने आत्यंतिक धार्मिक छळ सुरु केल्यावर, गोव्यातील हरमळ येथून ही मूर्ती वालावल येथे आणण्यात आली, असेही म्हटले जाते. लक्ष्मीनारायणाची मूर्ती म्हटले […]

गूढ रम्य, निसर्गरम्य — मालवणजवळचा धामापूर तलाव !

या तलावाच्या परिसरात विलक्षण शांत निसर्ग पसरलेला आहे. तेथे या तलावाबाबत काही गूढ आख्यायिका आहेत. पूर्वी येथील देवीला प्रार्थना केली की एखाद्या गरीब मुलीच्या विवाहासाठी, तलावातून दागिन्यांची परडी वर येत असे. लग्न झाले की हे दागिने परडीत भरून पुन्हा तळ्यात सोडून दिले जात. पण कुणालातरी दागिने परत न करण्याचा मोह झाला आणि नंतर हे दागिने येणे […]

मराठी की मरींदी ?

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजमाषा दिन ! सध्याच्या मराठी भाषेच्या स्थितीबद्दल मी लिहिलेला एक छोटा लेख दैनिक नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख आपल्याला पाठवीत आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. आपल्याला महाराष्ट्रातच ” मराठी राजभाषा दिन” साजरा करावा लागतो हेच आधी मोठे दुर्दैव आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर प्रत्येक राज्यात राज्यभाषेतून सर्व व्यवहार होऊ लागले. […]

प्रेझेंट देण्यासाठी वेगळी पाकिटे !

हल्ली भेटवस्तू द्यायच्या असतील तर पुन्हा एकदा गहन प्रश्न पडायला लागलाय काय द्यायचे ? पूर्वी लग्नामध्ये ५-५,६-६ मिल्क कुकर्स,कफ लिंक्स,४/५ लेमन सेट प्रेझेंट आलेले असायचे. नंतर फ्लॉवर पॉटस, स्टीलची भांडी,घड्याळे,पेन्स,रुमाल. आता अगणित निरुपयोगी चीनी वस्तू,गणपतीच्या विविध मूर्ती,नको असलेले शो पिसेस. काय द्यायचे प्रेझेंट ?… लोकं पुन्हा रोख रक्कमच देण्याकडे आता पुन्हा वळायला लागली आहेत. मी स्वत: […]

साला एक मिक्सर …..

कुटणे, दळणे, भरडणे, कांडणे, सडणे,फोडणे, वाटणे …केवढ्या या क्रिया ! आणि त्यासाठी पूर्वी घराघरातून जाती,( किमान २ /३ प्रकारची ), पाटा-वरवंटा, खलबत्ता , रगडा, उखळ-मुसळ अशा गोष्टी असायच्याच ..दगडी वस्तूंना टाकी लावून घेणे, लाकडी वस्तू नीट साफ करणे, लोखंडी वस्तू धुतल्यावर गंज लागू नये म्हणून नीट पुसून ठेवणे अशी केवढी उस्तवा र असायची ! मसाल्याचे काही […]

आहेर आणि अभिनंदनाच्या आणखी काही तऱ्हा !

विशेष निमित्ताने विविध वयाच्या आणि नात्याच्या माणसांना शुभेच्छा देण्याचा कल आता वाढतोच आहे. पैशांना काही मोलच राहिले नाही. कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला आणि उत्सवमूर्तीला विकत घेतलेली वस्तू आवडेलच याचा नेम नसतो. मग “हटके ” असे काही द्यावे असे वाटते.त्यासाठीच मी अलीकडेच काही वेगळ्या वस्तू बनवून दिल्या त्याची ही थोडी झलक ! फक्त महत्वाचे म्हणजे […]

दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव !

१० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील ” छंदोत्सव २०१७ “ या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी ,उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व […]

नव्या पैशांची ‘षष्ठ्यब्दीपूर्ती’ !!

स्वातंत्र्योत्तर काळात, लोकांना सहज करता येत असलेले परंतु आकडेमोडीसाठी अत्यंत किचकट आर्थिक व्यवहार सुलभतेने व्हावेत, म्हणून १ एप्रिल १९५७ रोजी दशमान पद्धत आणि नवीन नाणी व्यवहारात आली. या ” नव्या ” म्हटल्या गेलेल्या पैशांची आता ” षष्ठ्यब्दीपूर्ती ” साजरी होत आहे. त्या निमित्ताने हे थोडे स्मरणरंजन !! ” नवाकाळ” वृत्तपत्राने माझा हा लेख प्रसिद्ध केला आहे. […]

काही नवीन मोबाईल म्हणी—

मी अजूनही मोबाईल फोन वापरत नाही.मोबाईल या विषयावर आता उलटसुलट बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यात वादच नाही. पण तरी मी अजूनही मोबाईल वापरीत नाही आणि त्यामुळे माझे फारसे काही अडतही नाही. पण माल याचे फायदे असे की प्रवासात एखादे पुस्तक वाचू शकतो. मित्र असला आणि त्याचा मोबाईल मध्येच नाही वाजला […]

बा. सी. मर्ढेकर यांचा नवीन पाऊस

अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात. मराठीतील काही कवींच्या कवितांची अर्कचित्रे काढण्याचा हा प्रयत्न आहे. या […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..