कौस्तुभमणी
रत्नाकर मंथनात दिव्यरत्न कौस्तुभात महाविष्णू आभुषती कंठीमणी विराजती कालीयाने देऊ केला कौस्तभास श्रीकृष्णाला शुभ्रमणी घरी ठेवू संतुष्टता मना देऊ थोररत्न मिळताच उधाण हे आनंदाच — सौ. माणीक शुरजोशी नाशिक
रत्नाकर मंथनात दिव्यरत्न कौस्तुभात महाविष्णू आभुषती कंठीमणी विराजती कालीयाने देऊ केला कौस्तभास श्रीकृष्णाला शुभ्रमणी घरी ठेवू संतुष्टता मना देऊ थोररत्न मिळताच उधाण हे आनंदाच — सौ. माणीक शुरजोशी नाशिक
भिडे वाडा साक्ष देतो शिक्षणाची महती गातो सावित्रिने वसा घेतला ज्ञानदान यज्ञ पेटला अन्यायाला तोंड दिले साक्षरतेचे द्वार खुले रात्र शाळा मुलींची शाळा शिकविण्याचा तिला लळा ज्ञान ज्योती क्रांती ज्योती ज्योतिबांची तेजस्वी मुर्ती घडविला इतिहास साक्षरतेचा नवा प्रवास निर्भय,निडर ज्ञान फुला अभिवादन करते तुला सौ.माणीक शुरजोशी. नाशिक. भिडे वाडा साक्ष देतो शिक्षणाची महती गातो सावित्रिने वसा […]
१) देशप्रेम देशावर करावेच जन्मभर २) सैनिक हे लढतात प्राणत्याग करतात ३) देशसेवा व्रतमाझे नित्य करी कार्य माझे ४) देशास्तव प्राण देऊ शुत्रुचाच प्राण घेऊ ५) राष्ट्रगीताचा ठेवूया मान करू सदाच त्याचा सन्मान ६) देशा साठी जे लढले ते सारेच हुतात्मे झाले ७) अमरत्व मला मिळो लढण्यास स्फुर्ती मिळो ८) क्रांती सुर्य उजळती दशदिशा गाजवती ९) […]
जलबिंदू इवलासा आवडतो हा फारसा नभात तो दावतोना इंद्रधनू शोभतोना थेंबातूनी जाता तेज दिसतसे रंग शेज कधी दिसे मज मोती कधी वाटे हिरा किती पहाटेस दवबिंदू रुप घेई जलसिंधू हिमालयी हा गोठतो क्षणार्धात बर्फ होतो द्रव स्थिती वायू स्थिती थेंबा तुझी जलस्थिती — सौ.माणिक शुरजोशी नाशिक
*चारोळी क्रमांक १* *शब्द:अक्षर,शब्द,वाक्य,काव्य* अक्षर अर्थपुर्ण जुळताच शब्द शब्दा-शब्दांनी बनले वाक्य वाक्य योजता होते काव्य काव्यात असे लयबद्ध यमक शक्य *चारोळी क्रमांक २* *शब्द:तास,दिवस,मास,वर्ष* तास चोवीस होताच होई दिवस दिवसांचे गणन तीस होता एक मास मास होताच बारा सरे वर्ष वर्षाची सरत्या बात असते खास *चारोळी क्रमांक ३* *शब्द:बालपण,तरुणपण,प्रौढपण,म्हातारपण* बालपणीच्या गमती नसती तरुणपणी।। तारुण्यातली कर्तव्य ,पायाभरणी […]
प्रेमात पडते हे वेडे प्रेम पाखरू तुझ्यावर ही प्रीत जडते //१// धुंदीत जगते मन गुंतले स्वप्नात स्वप्नी नभात ते विहरते //२// बागेत बागडे फुलावर विसावले फुलपाखरू स्वच्छंदी गडे//३// मकरंद घेण्या मन आज आतुरले फुलाफुलातुनी हुंदडण्या //४// हुंदडले अती हाती भरल्या ओंजळी मधुओंजळ करना रिती //५// प्राशी मधुरस हे प्रेम पाखरू खुश प्रित-अंगणी लागे चुरस//६// — सौ.माणिक […]
मनाला भुरळ घालणारे,स्वच्छंदी बागडणारे . स्वप्नमयी दुनियेत रमणारे. पंख लावून नभांगणी विहरणारे. मोरपंखी,रंगीबेरंगी, कानात वारं भरल्यावर उनाड कोकरागत उंडारणारे. मनाला मोहीनी घालणारे. महाविद्यालयीन *क्षण मंतरलेले*. तासिका बुडवून पारावर घालवलेले . पुस्तकात पुस्तक ठेवून वेड्यागत वाचन केलेले. गाण्यांचे बोल मुखोद्गत केलेले. शेले-पागोटे चढवून स्नेहसंमेलानात हास्याचे कारंजे फुलवलेले महाविद्यालयातले हे *क्षण मंतरलेले* फिरून व्हावे का तरूण महाविद्यालयिन जगणे […]
अनुप्रास अलंकार चारोळी (१) गाता गीत गाऊनी गायकाघरी गायकी गाजती गीतमैफीली गान कोकीळ गात की (२) चमच्याने चिवडा चाखा चाखतांना चापून चारा चिवड्यातल्या चारदाण्यासह चावून चावाच चुपचाप सारा (३) गंध गुलमोहराचा गंधाळला गारवारा गोकर्ण गेला गगनासी गुरवाघरी गेला गावसारा (४) हलवाई हलवती हलवा हल्दीरामचीच हवा हिरवीबर्फी हिरवापिस्ता हिरव्यातील हिरवा (५) नव्याची नवलाई नवरीच्या नथनीची नाकात नसतांना […]
आपल्या मनीच्या भावनांचा।। चित्रपट असावा अक्षरांचा।। शब्दांतुनी तो रेखाटायचा।। हलाकासा काव्यसडा शिंपायचा — सौ.माणिक शूरजोशी
मुक्तछंद हा काव्यप्रकार मला खुप आवडतो. यमक साधता साधता काव्य सहज प्रभावी व प्रवाही होतं,नाही का? *काव्य* काही अर्थपुर्ण मुळाक्षरं गुंफित जावी अर्थपुर्ण शब्दांची तळी उचलावी त्या शब्दांतून अलंकृत रचना साधावी नटली ,सजली की तिला काव्य मैफिलीत सादर करावी दर्दी रसिकांची दाद मिळवावी दाद मिळताच मी कवी म्हणून प्रौढी मिरवावी — सौ.माणिक शुरजोशी नाशिक
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions