तुम्ही चंदना प्रमाणे अपार झिजला बाबा (गीत)
तुम्ही चंदना प्रमाणे अपार झिजला बाबा केले तुम्ही सुगंधीत अमुचे शिवार बाबा।।धृ।। रामजी-भिमाबाई ,माता -पिता आपुले होते।। पत्नी रमाई,सवीता यशवंत पुत्र होते।। भिवा,भीमा,भीम आपले टोपण नावे बाबा।। केले तुम्ही सुगंधित अमुचे शिवार बाबा ।।१।। लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स , कोलंबिया।। विद्यापिठातून अर्थशास्त्रात डॉ.मिळवल्या।। अनेक पदव्या घेऊन शिक्षित झाले बाबा।। केले तुम्ही सुगंधीत आमुचे शिवार बाबा ।।२।। […]