नवीन लेखन...

महागाई थांब

कांदा नी भाकर किती महागली पोट कसे भरू गळचेपी झाली मेथीची जुडाई पन्नाशीला आली कोथिंबीर लुप्त मी घिरट्या घाली काही भाज्या तर झाल्या महाराणी गातात नेहमी श्रीमंतीची गाणी राब राबतो रे शेतकरी शेता दलाल पदरी माप काहो घेता ज्याचा आहे नफा त्याला द्यानं जरा फुले सुखी वाफा दारी तर तरा महागाई थांब नको शोषू रक्त विनवणी […]

मायेचा बाप

मायेचा बाप कष्टकऱ्या धाप आम्हाला सुखी माप….१ कर्तव्य फार शिस्तिला हो धार लळा अपरंपार…….२ घराचे छत गावात ही पत उद्योगी पारंगत…….३ खर्च मोजून जावक योजून हौस भरभरून…….४ समसमान वागवतो छान शिकविण्यास रान…..५ अबोल फार महान विचार झाला नाही लाचार….६ करू सन्मान सदा असो भान घरादाराची शान…..७ हा ताणा बाणा भाव मनी जाणा हा संसाराचा कणा….८ — […]

विरहात

आई तुझ्या विरहात जगते मी आठवात *१* गेलीस नां तू सोडून बालपणी रडवून *२* अनाकाली मी पोरकी इथे सारे हे बेरकी *३* नाही कुणी विचारत संकटे ही सतावत *४* मार्ग मला सापडेना काही केल्या उमजेना *५* प्रयत्न मी करतेच ठेवण्याचा हास्यतेज *६* आता झाले अंतर्मुख जिवनात शोधे सुख *७* बाळ तुझी गुणी पहा स्वर्गात तू सुखी […]

भाकरी – चारोळी

आज मिळाली रोजंदारी खाऊ घरी भाजी-भाकरी जाता महागाईच्या बाजारी स्वप्न टांगलं खुंटीवरी — सौ.माणिक (रुबी)

तीन चारोळ्या…

१ – राजहंस बाकावर एकटा तो मागे गरीब बसतो तरी राजहंस आहे श्रेष्ठ बुद्धीत असतो २ – शहामृग आहे पंख भव्य दिव्य नाही उडताच येत देती दिलासा हे पाय धावण्यास बळ देत ३ – गिधाड तोंड वेंगाडती सारे नाव ऐकताच माझे स्वच्छ ठेवी परिसर अरे मित्र आम्ही तुझे — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

वेध गुलाबी थंडीचे

वेध गुलाबी थंडीचे पेटे शेकोटी रात्रीची फड रंगती गप्पांचे पार्टी असते हुर्ड्याची….१ पडे चांदणे रात्रीचे चंद्र निरभ्र आकाशी गुज सांगते मनीचे सखी ही प्रियकराशी….२ उब वाढता तनाची सय घालतो सखीसी आस असे मिलनाची आवतण रजईसी……. ३ निशा अंधाऱ्या रात्रीची साथ मिळे गारव्याची जादू रती-मदनाची प्रित खुले युगलांची……. ४ दिस आले प्रणयाचे रिते चषक मद्याचे वेध गुलाबी […]

अग्ग बाई!

अग्ग बाई!! सास्सु बाई सदा त्यांना अस्से घाई ओsss!अरेच्चा! पहा पहा आधुनिक पोषाख हा अय्यो गडे! इश्श गडे! माझ्झी सासू पहा गडे! त्यांना तुम्ही हसू नका नाव मुळी ठेवू नका अय्यो रामा! म्हणू नका अभ्यासू त्या ज्ञान ऐका ज्ञानपिठ पुरस्कार त्यांना मिळे मान थोर छंद त्यांचा ओssss!बघा ना पुस्तकांचा हा खजिना नम्र अति त्या आहेत हो!मी […]

सव्वीस नोव्हेंबर

काळ रात्र ठरे ही सव्वीस नोव्हेंबर देश रक्षण्या वीर तो मरे//१// होता भ्याड हल्ला घुसले हो अतिरेकी नाहक या ताजवरी डल्ला//२// घे बळी नाहक क्षण हा कर्दनकाळ कुठे फेडती असे पातक//३// ठाकले सैनिक मावळे हे शुर वीर महाराष्ट्राचे हेच पाईक //४// दोन दिस झाले ओलीस ठेवती सारे परि नच सैनिक थकले//५// शहीद होऊनी शत्रूसी पाणी पाजले […]

या वळणावर

या वळणावर खुप हुंदडलो बहुत बागडलो मनमानी जगलो लाडाकोडात वाढलो *बालपण* या वळणावर थोडा शिस्तिचा बडगा झालो थोडा मी कोडगा अभ्यासाचा असे तगादा काय करू आता सांगा *कौमार्यपण* या वळणावर मौज मस्ती व्याख्या बदलली यौवनाची नशा चढली स्वतंत्रतेची बाधा जडली *तारुण्यपण* या वळणावर सारी नशा उतरली लग्नबेडी पायी आली संसारी खेळी चालली जबाबदारीने कंबरडे वाकली *प्रौढपण* […]

1 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..