नवीन लेखन...

निसर्ग आणि मन (चारोळी)

*निसर्ग* अद्भुत घटनांनी भरलेला कविंना वेडावून सोडणारा तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला या मानवाला गुढतेत ढकलणारा *मन* मन हे चपळ चपळ कधी इथे तर कधी तिथे मन हे उथळ उथळ कधी रडे तर कधी हसे सौ.माणिक शुरजोशी नाशिक

कळेना कसे जडले रे मन (गीत)

कळेना कसे जडले रे मन आज हरपले माझे रे भान।।धृ।। फुलात दिसतो,मनी हसतो क्षणात जीव उगाच फसतो मन अजुनही आहे रे सान आज हरपले माझे रे भान।।१।। घरात होतसे तुझाच भास दिलवरा श्वासात तुझी आस साद ऐकण्या आतुरले कान आज हरपले माझे रे भान।।२।। तळमळ वाढे उगाच जीवा हळहळ दाटे मनात प्रिया कंठात दाटूनी आले रे […]

दुरावा

भारत भूच्या सीमेवरी लढण्या सैनिक असावा मनामध्ये नसावा कधी घरच्यांसाठी रे दुरावा देशाचे रक्षण करणे माझे हे कर्तव्य पहिले दुराव्यातही जवळीक ह्यातच हित रे आपुले भारत मातेचे शिपाई त्यांचे घरटे गावदेशी माता- पिता ,पत्नी-मुलांची बांधिलकी असे मनाशी नकोच खंत दुराव्याची नातीच अपुली प्रेमाची जाणीव देश रक्षणाची चिंता नाहीच दुराव्याची — सौ माणिक शुरजोशी नाशिक

श्लेष अलंकार चारोळी

श्लेषालंकार चारोळी (१) पारावरच्या गप्पांना झळाळी चढली आयुष्याची संध्याकाळ झाली जिवननौका पार होण्या आली जगण्यातली झळाळी गेली (२) नावात काय आहे नाव कमवून रहा तरच जिवन नाव पैलतीरी जाई पहा (३) हळदी-कुंकवाची आहे चाल तेव्हा उखाणा घेती छान उखाण्याला लावा चाल पतीराजांना द्यावा मान (४) अपयशाने खचतोस का? हार तरी का मानतोस प्रयत्नांना साथ देतोस का […]

प्रीत जडली आहो तुम्हावर (लावणी)

प्रीत जडली आहो तुम्हावर,कधी येणार घरी।। सांज झाली सख्या साजना,धडधड वाढली उरी।।धृ।। शृंगार केला तुमासाठी, माळला मोगरा सुगंधी ।। नाकात चमके नथनी, विडा रंगला मुखामंदी।। पैठणी नेसे येवल्याची, पदरी मोर जरतारी।। सांज झाली सख्या साजना, धडधड वाढली उरी ।।१।। ठसक्यावरी हा ठसका, याद केली का राया तुमी।। उशीर काव करतासा, धनी वाट पाहतो आमी।। अधीर झाली […]

आठवण आईची

माझी जन्मदात्री होती अतिव सोशिक जणू एक पावन गंगोत्री //१// पहाटे उठावे आटपावे आन्हिके ही पाल्यांसाठी आदर्श जपावे//२// होती सुगरण कोंड्याचा मांडाही करी लेकरा मायेची पखरण //३// न दुर्मुखलेली सदाच होती हसरी नी अगत्यास आसुसलेली//४// जाता सोडूनिया ये आठवण आईची ना करमे तिला सोडूनिया//५// जाता अचानक हळहळ दाटे मनी स्वप्नी डोकाव ना क्षणएक//६// सौ.माणिक शुरजोशी नाशिक

मी कविता का करते?

मी कविता का लिहिते मनाची कल्पकतेची धाव कागदापर्यंत पोहचते लखलखत्या लेखणीतून ती कागदावर उतरते कागदावरील कल्पक भाव हलकेच गुणगुणते त्यालाच तर कुणी काव्य म्हणते मग कल्पनेला आधिकच स्फुरण चढते म्हणून मी कविता लिहिते — सौ.माणिक शुरजोशी

मराठी संस्कृती (मुक्तछंद)

महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे थोर किती घंटानाद आणि काकड आरतीने होते प्रभातीची सुरुवात नामस्मरणाने सडासारवण,सुबक रांगोळी छान दारी अगत्याचे झुले तोरण छान येता वासुदेव दारी पसाभर धान्य देती नारी जात्यावरच्या ओवीने आयुष्याचे वस्त्र विणले दारोदारी गुढी उभारूनी नववर्ष स्वागत घरोघरी झुलला पाळणा रामनवमीसी हनुमंताची जयंती अंजनेरीसी भांडले-तंटले परी व्रतवैकल्य केले वडपोर्णिमे सवे हरतालिका पुजन केले घरोघरी […]

ज्ञानेंद्रीय

ज्ञानेंद्रियं जीभ सांगे चव कशी रसनेची तह्रा खाशी घ्राणेंद्रिय आहे खास पदार्थांचा घेई वास स्पर्शज्ञान महत्वाचे त्वचासांगे मर्म त्याचे दृष्टीविना कसा जगू सृष्टी सारी नेत्री बघू कर्णेंद्रिय सान जरी ऐकण्याचे कामकरी इंद्रीयात सर्वश्रेष्ठ ज्ञानेंद्रीयं आहे ज्येष्ठ — सौ.माणिक शूरजोशी नाशिक

1 2 3 4 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..