नवीन लेखन...

महानायिका

हो!!!! हो मी महानायिका बोलतेय नाव माझे सावित्रीबाई माझी जन्मदात्री लक्ष्मीआई ३जानेवारीला सुदिन उगवला खन्दोजी नेवसे यांच्याघरी कन्यारत्नास “पहिली धनाची पेटी”चा मान मिळाला. आजच्या सारखा गर्भपाताचा शाप नाही मिळाला. हो !!!!!!! हो मी महानायिका बोलतेय उपवर होताच १८४०सात ज्योतिरावांच्या घरचा उंबरठा ओलांडला. संरक्षक,समर्थक गुरू लाभता साक्षरतेचा वसा घेतला. हो!!!! हो मी महानायिका बोलतेय मी तर ज्ञानदानाचा […]

नववर्ष (हायकू)

*हायकू* नववर्ष *१* सु स्वागतम् द्वि सहस्त्र वीसात हो सुफलाम् *२* गरुड झेप घे या नव वर्षात दे स्वर्ण लेप *३* सुर जुळावे तन-मन-धनाचे सुख लाभावे *४* प्रभा फाकता कलरव हो झाला वर्ष -स्वागता *५* या पायघड्या घालते रे स्वागता आता ये गड्या *६* झाले स्वागत मोहरता लेखणी नव वर्षात — सौ.माणिक शुरजोशी

मैत्रीचे नाते (हायकू)

हायकू -मैत्रीचे नाते मैत्रीचे नाते हे युगानुयुगाचे बालपणीचे लुटू पुटूचे रुसण्या-फुसण्याचे जिवा-भावाचे वर्ग मित्राचे नाते वर्गा-वर्गात हे फुलायचे यौवनातले नाते हळूवार असे हो मैत्रीतले सुख -दु:खाचे नाते गाढ मैत्रीचे ते जपण्याचे — सौ.माणिक शुरजोशी.

बालपण

बालपण हे खरे जीवन हा जीवा भावाचा काळ हा जीवनातला सुखसमृद्ध बालपणीचा हा मन मौजेचा हसणे नी खिदळणे मंत्र सोप्पा सांगे जगण्याचा नसे मतभेद सारे काही असे नेक नको राग ,लोभ,चिंता खेद तन-मन-धन निरागसतेचा देश बालपण वाटे वृंदावन छोटी शिकवण विसरूनी जा कुशीत बालपण हे खरे जीवन चला गीत गाऊ होऊनी बघू लहान आता ना बालपणात […]

नव वर्ष

या हो स्वागताला उंबरठ्यासी बाराच्या सरता येता जल्लोष झाला//१// दिन उगवला नभात प्रभा फाकल्या संकल्पांचा क्षण उजळला//२// कुनिती,अनिती विस्मरणात गाडल्या आल्या की प्रगती,सुनिती//३// शंखनाद होता हा परिस स्पर्श झाला नाही मिळणार कुठे गोता//४// गुलाबी,शराबी नव वर्षाची पहाट पहा नसेल कुठे खराबी //५// सकारात्मकता असो विचारात सदा वाढो विश्वातली आत्मियता//६// — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

एक नवी पहाट

न चुकणारी घटना रोजची नवी पहाट पण आजची विशेष वाटे मज प्रभावळ तेज फाकले दशदिशात चैतन्य सळसळले चराचरात पक्षी कलरव करिते झाले गरुड झेप घेत ,स्वप्न माझे नभात विहरले फुलली वनराणी, हलकेच आली फुलराणी कुपी उघडता सुगंधाची परिमल वाटत फिरली प्रभाराणी ही एक नवी पहाट न ठरो जगरहाट या वर्षात दिसो नवा थाट वाहू दे चराचरात […]

शिक्षण

हे आहे शिक्षण सर्वंकश सर्वांगिण विकास साधू या या शाळा भरती प्रांगणात मनोमनी साक्षर होऊ या सर्वंकश शिक्षण सौ.माणिक शुरजोशी नाशिक

पोवाडा

माझा भारत महान हो हो माझा भारत महान।। किती गाऊ महती याची ,अपुरे माझे शब्द पडती हो जी जी जी।।धृ।। उत्तुंग इथल्या पर्वत रांगा ढाल माझ्या देशाची।। नद्या वाहती झुळझुळ इथल्या सुफलाम् रुपे वसुंधरेची हो जी जी जी।।१।। रक्षणार्थ भुमातेच्या शहीद झाली सुपुत्र माझ्या भारतीची।। झुंझारलेली शक्तीपिठे गौरवशाली गीत गाती पराक्रमाची हो जी जी जी।।२।। राम-कृष्ण […]

ही गुलाबी हवा (ललित)

ही गुलाबी हवा साक्षात चराचराला मोहजालात फसवू लागली.तिची माया प्रेमी युगलांना मोहजालात फसवूू लागली. रजईची उब,शेकोटीची उब,मायेची उब,दोहडची उब . सारं सारं फिके पडले. सगळीकडे एकच एक नशा होती ती या ,”गुलाबी हवेची” […]

नटखट

दही-दुध खातो खोड्याही करतो जीव माझा थकतो तरी किती पळवतो।। नटखट कान्हा येतो मुरली ही वाजवतो वेडं मला करितो यमुनाजळी लपतो।। पाठी पाठी धावतो लिला किती दावतो राधेला भुलवितो मिरेला पावतो।। भक्तांना तारतो दुष्टांना मारतो गीता ही वदतो अवतार संपवितो।। घरोघरी राहतो यशोदेसी रिझवतो बिंबात प्रतिबिंबतो जीवा मोक्षही देतो।। भजनात दंगतो भक्तीत रंगतो महिमा तुझा सांगतो […]

1 4 5 6 7 8 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..