देणं – घेणं (हायकू)
निसर्ग देणं वापरा हो जपून आहे ते लेणं घेणे हा हक्क दिला आहे सर्वांना घेतो की चक्क किती ही हाव सदा ओरबाडतो नाशास वाव ऊस चाखावा नको चाखूस मुळ वंश जपावा हो रे सावध विनाशकाली स्वत: होशी पारध निसर्ग जप परहितात हित हे असो तप सौ.माणिक शुरजोशी नाशिक ८८७९३3८०१९