सान पोर
बाल वय कष्टमय ढिगाऱ्यात झुरतय माय जाते कामावर तिच्या मागे जाई पोर वितभर या पोटाची चिंता असे या आईची कष्टकरी गाळी घाम तेव्हा मिळे थोडा दाम गरिबाची रित न्यारी जगण्याची ओढ भारी जिथे तिथे खडकहे विरंगुळा लेकीस हे दगडात आनंदी ती बघताच सुन्न मती — सौ.माणिक शुरजोशी