‘रिव्हर्सिंग फॉल्स’ची किमया
उलट्या दिशेने वाहत असलेला पाण्याचा प्रवाह कोणी पाहिलाय ? त्याचे उत्तर कदाचित नाही, असेच असेल. परंतु मी मात्र त्याचे उत्तर ‘हो’ असेच देईन. उंच भागाकडून सखल प्रदेशाकडे वाहत जाणे हा पाण्याचा गुणधर्म ! मग माझे उत्तर ‘हो’ कसे ? असा प्रश्न सर्वांनाच पडणे स्वाभाविक आहे. सेंटजॉन शहराजवळच सेंटजॉन नदीत हा चमत्कार पहायला मिळतो. हा प्रकार पाहिल्यानंतर कोण्या जादुगाराने केलेला नजरबंदीचा; खेळ वाटावा; परंतु तसे कांही नाही, तर ती निसर्गाची किमया आहे. […]