खांदेदुखी (मध्यम वयातील)
मध्यमवयात खांदादुखीला सुरुवात झाल्यास अनेक कारणे असू शकतात. याही वयात खांदा वळविणाऱ्या स्नायूंना इजा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारच्या संधीवाताच्या रोगामुळे खादा दुखू शकतो. अनेक वेळा मानेतील हाडात वयोमानाने होणाऱ्या बदलाने (स्पॉन्डिलेसिस) तसेच दोन मणक्यातील गादी सरकल्याने खांद्याच्या भागात तसेच खांद्याच्या आजुबाजूला दुखू शकते. पुन्हा पुन्हा एकच प्रकारचे छोटे वजन उचलण्याचे किंवा सुतारासारखे सतत हातोडा चालविण्याचे काम […]