कृत्रिम वंगणे
कृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की गोठत नाहीत, त्यामुळे ती फार मोठ्या तापमानाच्या कक्षेत कार्यरत शकतात. द्रावणीयता राहू विष्यदंता (व्हिस्कोसिटी), अग्निरोधकता (फायर रिटाईंसी), अपायकारकता (टॉक्सिसिटी) इत्यादी बाबतीत कृत्रिम वंगणतेले खनिज वंगणतेलांपेक्षा कांकणभर सरस असतात. सिंथेटिक हायड्रोकार्बस, ऑरगॅनिक इस्टर्स, पोलिग्लायकॉल इथर्स, सिलिकाँस, सिलाँस, परफ्लुरोइथर्स, क्लोरोफ्लुरो कार्बंस हे वंगणतेलांचे काही प्रकार. […]