प्रा. एम. एम. शर्मा
१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले. […]