डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले
डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले यांनी १९४५ साली बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या नॅशनल टेस्ट हाऊस या प्रयोगशाळेत जाऊन रसायनशास्त्राच्या अद्ययावत विश्लेषण पद्धतीचे संशोधन केले. १९४९ साली डॉ. भाभा यांनी त्यांना अणू संशोधन संस्थेत काम करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले व त्यांना अॅनालिटिकल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून नेमले. पुढे ते संपूर्ण रसायनशास्त्र […]