नवीन लेखन...

लेप्टोस्पायरोसीस (भाग १)

गेल्या काही वर्षांत लेप्टोस्पायरोसीस या आजाराने पावसाळ्यात अनेक बळी घेतल्याचे आपण वाचले असेल. हा आजार नेमका कशामुळे व कसा होतो हे आज आपण थोडे समजून घेऊ या. या आजाराचा पहिला उल्लेख एडॉल्फ विल यांनी सन १८८६ मध्ये केला होता, म्हणून याला ‘विल्स डिसीज’ असेही म्हणतात. लेप्टोस्पायरोसीस हा आजार लेप्टोस्पायरा जातीच्या स्पायरोकीट या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूच्या […]

मधुमेहींसाठी आहारनियमन

हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात. एकतर डायबिटीसमुळे शारीरिक तणाव असतोच शिवाय मानसिक तणावही येतो. अनेकदा लोकं गोंधळून जातात. आपण नक्की काय करावं, काय खावं, […]

प्रसूतीच्या अवस्था

पहिल्या अवस्थेच्या सुरुवातीला पाय जड होतात, कंबर दुखते, पोटात कळा येऊ १२ आठव लागतात. हळूहळू कळ जास्त वेळ राहते, दोन कळांमधले अंतर कमी होऊ लागते. दहा मिनिटांमध्ये २-३ कळा येत असतील तर प्रसूती समाधानकारक आहे, असे समजावे. कळ आलेली असताना मातेने दीर्घ श्वास घ्यायचा. सर्व अंग सैल सोडायचे. दोन कळांच्या मधल्या वेळात स्वस्थ पडून राहायचे. सर्व […]

नागीण (उत्तरार्ध)

विषाणूंमुळे होणाऱ्या नागीण या रोगाविषयी समाजात अनेक गैरसमज प्रचलित ाहेत. एका बाजूने सुरू झालेले पुरळ शरीराभोवती संपूर्णपणे दुसऱ्या बाजूपर्यंत पसरून त्याची दोन्ही तोंडे एकमेकांना मिळाली तर आजाराचे स्वरूप गंभीर होते, असा एक गैरसमज आहे; परंतु यात अजिबात तथ्य नाही. चेतासंस्थेला विषाणूंची बाधा होत असल्याकारणाने हा रोग साहजिकच चेतासंस्थेच्या अनुषंगाने वाढत जातो. त्यामुळे नागीणीने विळखा घातल्यासारखा आभास […]

कॉलरा ऊर्फ पटकी

पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा मध्यावर कॉलरा डोके वर काढतो. गेल्या शतकात ७ वेळा पृथ्वीवर कॉलराने थैमान घातले. प्रत्येक खेपेला हे जिवाणू वेगवेगळ्या स्वरूपात आले. व्हिब्रियो कॉलरा नावाने ओळखले जाणारे हे जिवाणू एखाद्या स्वल्पविरामाप्रमाणे दिसतात. शेपट्यामुळे हे चपळ होतात. ऑक्सिजनविरहित वातावरणात वाढणारे व्हिब्रियो कॉलरा २० अंश सें.पेक्षा अधिक तापमान असणाऱ्या मचूळ पाण्यात म्हणजे नदीमुखाशी व किनाऱ्यालगतच्या खाजणात जास्त […]

वार्धक्याविषयी बोलू काही…

जीवनातला शेवटचा टप्पा वार्धक्य. याची आखणी जर तरुणपणापासून व्यवस्थित केली तर हा अटळ प्रवास आनंदमयी होईल. आयुष्याचा आलेख पाहिला तर जन्मापासून पंचविशीपर्यंत चढण असते, पंचविशीनंतर तिशीपर्यंत सपाट पठार व तिशीनंतर घसरण सुरू होते, पण ती वर्षाला १ टक्का इतकी मंद असल्याने लक्षातही येत नाही. वार्धक्य लांब ठेवायचा हाच खरा काल. त्यावरच शास्त्रज्ञांनी आपले लक्ष केंद्रित केले. […]

वंध्यत्व (भाग २)

शुक्रजंतू तयार होणे आणि गर्भाचे रोपण होणे येथपर्यंत अनेक अडथळे येऊ शकतात. शुक्रजंतू तयार न होणे, तयार झाल्यास ते व्यवस्थित तऱ्हेने पक्व न होणे, शुक्र-नलिकेमध्ये काही अडथळे आल्यामुळे शिस्नापर्यंत न पोहोचणे, शिस्नामधून बाहेर पडू न शकणे (इज्यॅक्युलेशन), बाहेर पडले तरी योनीमार्गातून- गर्भाशयातून गर्भनलिकेपर्यंत न पोहोचणे, स्त्रीबीजाशी फलन होऊ न शकणे अशी अनेक किंवा एकच कारण वंध्यत्व […]

नागीण (पूर्वार्ध)

नागीण (हरपीस सिम्लेक्स) हा रोग एच. एस. वन किंवा एच. एस. टू. हरपीस होमोनीस या विषाणूंमुळे होतो. साधारणतः याचा प्रादुर्भाव श्लेश्मल पटल किंवा त्वचा, मध्यवर्ती चेतासंस्था अथवा मधून मधून आंतरंग अवयवांना होऊ शकतो. हे अतिसूक्ष्म विषाणू शरीरात प्रवेश झाल्यावर ते १४ दिवस सुप्तावस्थेत राहतात. या विषाणूंची लागण शरीरातील चेतापेशींना होते. खरचटलेले श्लेश्मल पटल किंवा त्वचा यांच्याशी […]

गर्भवतीची विशेष तपासणी

स्त्रीचे जास्त वय (३० च्या पुढे), वाढलेला रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, पूर्वी झालेले गर्भपात, मधुमेही स्त्री, आधीचा मृत गर्भ, अगर पूर्वी बाळ जन्मल्यावर थोड्याच वेळात मृत झाल्यास, जन्मतः बाळाचे वजन फारच कमी (दोन किलोपेक्षा कमी) पोटात जुळे गर्भ, आधीचे सिझेरिअन असेल अगर आता करण्याची शक्यता असेल, पाणमोट बरेच दिवस आधी फुटल्यास, अपेक्षित तारखेपेक्षा जास्त दिवस वर गेल्यास, […]

गर्भवतीच्या चाचण्या

गर्भारपणाचे नऊ महिने संपल्यानंतर प्रसूती होऊन सुदृढ माता आपल्या सुखरूप बाळाला घेऊन घरी जाते हे पाहणे स्त्रीरोगतज्ज्ञांचे ध्येय असते. यासाठी युनिसेफसारख्या जागतिक संघटनांनी ‘चाइल्ड सर्व्हायवल’ आणि ‘सेफ मदरहूड’ असा कार्यक्रम राबविला. तत्त्वप्रणाली राबविली गेली. आपल्यासारख्या विकसनशील देशात त्याची अमलबजावणी योग्य तऱ्हेने झाली तर एक लाख प्रसूतीमध्ये होणाऱ्या ४३० पेक्षा जास्त माता-मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. […]

1 6 7 8 9 10 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..