नमस्कार वाचकहो,
मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा.
मी, सातार्यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता.
मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत.
मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत.
माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
पण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये…. असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात. पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो? या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत…. […]
निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही. चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली….. आणि ती दचकून मागं सरकली….. […]
दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले. ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही खाली उतरले. त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले. […]
निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस. मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me” […]
ती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता. तिने मागे वळून रोहनला आवाज दिला … […]
बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले. आता ते उताराच्या रस्त्याला लागले. हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं. तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. ……. […]
त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. […]
ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले….. […]
ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं. […]
“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?” दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले…. […]