नवीन लेखन...
Avatar
About मित्रहो
“मित्रहो” (mitraho.wordpress.com)
Contact: Website

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. […]

जाब

“ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू” तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. […]

माझा मोबाइल डाएट

मोबाइल डायेट हा अत्यंत कठीण प्रकार आहे. मनुष्य अन्नपाण्याविना चार दिवस काढू शकतो पण मोबाइलशिवाय नाही. अचानक मोबाइल बघणे बंद केल्यास वेड लागण्याची शक्यता आहे. अशा शारीरीक आणि मानसिक गरजांचा अभ्यास करुनच हा मोबाइल डायेट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर हा डायेट करीत आहेत यात काहीही शारीरीक किंवा मानसिक बाधा झाल्यास आम्ही जबाबदार नाही. […]

मी व्यायाम करतो

‘ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो. […]

एम एच बारा आणि मी

मराठी माणसाने अशा कितीही शहरांमधे झेंडे गाडले असले तरी मराठी माणसासाठी पुणे म्हणजे पुणेच. त्या एम एच बारा अशा पाट्या दिसल्या की मराठी माणसाचा उर कसा भरुन येतो. मराठी माणूस हा कधीतरी पुण्यात येउन गेलेला असतो किंवा त्याचे कुणीतरी पुण्यात येउन गेलेले असते. पुण्यात आला म्हणजे मित्रांमधे छापायला एखादा अनुभव हा आलाच. […]

सही, सही एकदम सही

असे हे सही सहीचे सहीसही सहीपुराण. काही सह्या अशा असतात की ज्या फ्रेम करावाशा वाटतात, ती फ्रेम दिवाणखान्यात टांगावशी वाटते. त्या फ्रेमकडे बघितल्याने प्रेरणा मिळते. अशा साऱ्या सह्यांना माझा परत एकदा सादर प्रणाम. […]

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ‘ते का करुन रायली असन बा’ पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले सारेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होता. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन वर्गाभायेर काढल […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..