गदिमांच्या ‘चोर बाजार’ पासून बनला गुरुदत्तचा ‘प्यासा’
पंचवटीच्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते. फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या. त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले, ‘या गुरुदत्तजी!’. हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता ‘गुरुदत्त’ आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते, ‘माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखेंगे तो […]