वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे
वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे. […]