नवीन लेखन...
नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

स्वतः जळून उब देता आली पाहिजे !

आपण निस्वार्थी प्रेम करून, जर इतरांच्या जीवनात थोडासाही आनंद निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनात आनंदाचे लक्ष लक्ष क्षण येतील.

काडीकचऱ्यात सडून नष्ट होण्यापेक्षा स्वतः जळून दुसऱ्यांना उब देता आली पाहिजे.
[…]

कुटील अमेरिका व दोस्त राष्ट्रांचे स्वार्थी हल्ले

अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही.अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.

भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
[…]

आठवणीतील क्षण

माझी पावले यंत्रवत झपाझप चालत होती, मात्र बघितलेल्या चित्राने मनात काहूर माजलेले होते. हरीणावरील अनपेक्षित हल्ल्याचा प्रसंग कसा असेल ? हृदयाचे तुकडे करून टाकणाऱ्या प्रसंगांनी किती हरीणांचे दररोज मुडदे पडले जात असतील ? हा प्रश्नच मला अतर्क्य वाटतो …….
[…]

केव्हा थांबेल वणव्यांचे सत्र…!

उन्हाळ्याच्या वेळी वेगवेगळी वन्य उत्पादने गोळा करण्यासाठी आदिवासी तसेच अन्य बांधव जंगलात जातात. डिंक,तेंदूपत्ता, मोहफुले,हिरडा बेहडा तसेच रानमेवा गोळा करून, त्यांच्या विक्रीतून आपले जीवन जगत असतात. वन्य उत्पादने गोळा करण्यासाठी काही वेळा स्वच्छ जागेची गरज असते, ती जागा स्वच्च्छ करण्यासाठी जंगलांना आग लावून दिली जाते.त्या आगीचे वणव्यात रुपांतरण होता आणि वणवा पसरत जातो. अल्प शिक्षणामुळे जंगलांवर […]

अजूनही जीवंत आहे माणुसकी…!!!

भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे. […]

पर्यावरणचा र्‍हास, आवळत आहे मृत्यूचा पाश !

पाण्याचे व प्रदुषणाचे संकट आज आपल्याला मोठे वाटत नसले, तरी त्याची तीव्रता क्षणोक्षणी वाढत आहे. यासंदर्भातला निष्काळजीपणा मानवजातीच्या विनाशापर्यंत नेऊ शकते.सजीवांच्या अस्तित्वासाठी शुद्ध व निर्मळ पाण्याची गरज आहे. पाण्यात विरघळलेल्या आक्सिजनचे प्रमाण प्रतिलिटर ८ मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रदूषित होते, हेच प्रमाण प्रतिलिटर ४ मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास सजीव नष्ट होतात. गरजेच्या प्रमाणात पाणी दिवसेंदिवस […]

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अत्यावश्यक आहे.

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.
[…]

1 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..